Geography of Maharashtra (Nighoj potholes)
श्री मळगंगा,निघोज रांजणखळगे श्री मळगंगा प्रसन्न माता मळगंगा, कुंडमाऊली, घागर ,निघोजचे जगप्रसिध्द रांजणखळगे ●►निघोजचे धार्मिक भौगोलिक अविष्कार ! अहमदनगर जिल्हयात पारनेर तालुक्यातील निघोज या गावामध्ये माता मळगंगा देवीचे वास्तव्य आहे. या देवीची एक मोठी महती आहे गावामध्ये मनाला आकर्षित कराव असं पुर्ण संगमरवरी दगडामधील मंदीराचे बांधकाम आहे. गावापासून फक्त २ कि.मी. अंतरावर १९९० च्या दरम्यान गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड ने ज्या ठिकाणाला वेगळे स्थान म्हणून मानाचा दर्जा देऊन जागतिक पातळीवर नोंद घेतली ते ठिकाण म्हणजेच निघोजच्या कुकडी नदीवरील रांजणखळगे होय. या रांजणखळग्यांना स्थानिक भाषेत कुंड कुंडमाऊली असे म्हणतात. ●►निघोजचे जगप्रसिध्द रांजणखळगे आशिया खंडातील सर्वात मोठे कुंड म्हणून या ठिकाणाची ख्याती आहे. कित्येक शतकापासून या कुंडामध्ये सतत पाणी असते. कितीही दुष्काळ पडला तरी पाण्याची पातळी कमी होत नाही. अतिशय सुंदर अशा कोरीव कामाप्रमाणे खडक या ठिकाणी पहावयास मिळतो. वर्षाच्या तिनही ऋतुमध्ये या ठिकाणी निसर्गाचे वेगवेगळे सौदर्य पहावयास मिळते. पावसाळयात खळखळणार पाणी...